Majhi Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा तहसीलदार संघटनेचा इशारा
मुंबई : Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा सुरु आहे. घरोघरी महिला कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. या योजनेच्या अमंलबजावणीला १ जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची फॉर्म भरण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.
महिलांना यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता लाडकी बहीण योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून तहसीलदारांना मुक्त करण्याची मागणी तहसीलदार व नायब तहसिलदार संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांसह राज्याच्या मुख्य सचिवांना संघटनेचे पत्र लिहिले आहे.
महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी असणाऱ्या या योजनेत महिला व बाल विकास अधिकाऱ्यांऐवजी तहसीलदार
यांना सदस्य सचिव करण्यात आल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana)
तहसीलदारांकडे महसूल कामांसह निवडणुका आणि इतरही कामांचा मोठा व्याप असल्याचे कारण संघटनेने दिले आहे.
संघटनेने केलेली मागणी मान्य न झाल्यास राज्यभर लाडकी बहीण योजनेच्या
कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?