Malav Assembly Election 2024 | सुनील शेळकेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ; भाजप, मविआ नंतर आता मनसेचा बापू भेगडेंना जाहीर पाठिंबा

मावळ: Malav Assembly Election 2024 | मावळात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडून (Mahayuti) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) सुनील शेळके (Sunil Shelke MLA) यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळसाठी आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर होताच मावळ तालुक्यातील भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवले होते.
त्यानंतर बापूसाहेब भेगडे (Bapu Bhegade) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बापू भेगडेंना जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी जाहीर भूमिका मांडली होती.
मविआच्या जागावाटपात मावळ मतदारसंघ शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) वाट्याला येणार होता. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शरद पवार गटाने त्याठिकाणी उमेदवार न देता बापू भेगडेंना पाठिंबा दिला आहे.
त्यानंतर आज मावळमध्ये सर्वपक्षीय पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मनसेने
बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही मनसेचे सर्वजण बापू भेगडे यांना जाहीरपणे पाठिंबा देत असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी म्हटलं आहे.
मावळमध्ये अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकत आता वाढली आहे.
महाविकास आघाडीसह, भाजप, मनसे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिल्याने
मावळ विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
राज्यासह मुंबईत मनसेचं विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्रं दिसून येत आहे.
मात्र, मावळात मनसेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा