Malshiras Assembly Election 2024 | माळशिरस मतदारसंघात राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर असा सामना रंगणार; यंदा भाजपसाठी मोठे आव्हान

सोलापूर: Malshiras Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर २२ उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपने २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपने १४६ उमेदवारांना आत्तापर्यंत निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
दरम्यान या यादीमध्ये माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या नावाचा समावेश आहे. मतदारसंघात यावेळी उमेदवार बदलला जाणार अशी चर्चा सुरु होती. मात्र आता भाजपकडून सातपुते यांचे नाव घोषित झाल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान आता या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP)
उमेदवार उत्तम जानकर (Uttam Jankar) विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत येथील मोहिते कुटुंबीय भाजपसोबत होते.
त्यामुळे सातपुते निवडून येण्यास अडचण आली नाही. दरम्यान आता मोहिते कुटुंबीय
शरद पवारांसोबत असल्याने यंदाची निवडणूक भाजपसाठी अवघड असल्याचे बोलले जातेय.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा