Malshiras Vidhan Sabha | फडणवीसांच्या विश्वासू आमदाराची उमेदवारी रद्द होणार? माळशिरसमध्ये भाजपची नवी रणनीती; राजकीय हालचालींना वेग

माळशिरस : Malshiras Vidhan Sabha | माळशिरस विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. या राखीव मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात भाजप (BJP) अलर्ट मोडवर आलेय.
संविधान बदलणार या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अपप्रचाराचा चेहरा उघडा पाडण्यासाठी अनुसूचित जातीचा उमेदवार देण्याचा भाजपकडून विचार सुरू आहे. माळशिरस मधून अतुल सरतापे (Atul Sartape) यांचे नाव आघाडीवर आहे.
महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर (Uttam Jankar) यांची उमेदवारी निश्चित असताना त्यांच्यापुढे आव्हान देण्यासाठी भाजपमध्ये अद्याप उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरसमधील स्थानिक तसेच अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून भाजपमधील काही नेत्यांनी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस अतुल सरतापे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे.
माळशिरसमध्ये स्थानिक आणि मूळ अनुसूचित जातीचा उमेदवार दिला
तर या ठिकाणी येथील अनुसूचित जातीचा मतदार भाजपसोबत येईल अशी आशा भाजपला आहे.
त्यामुळे राम सातपुते यांच्याशिवाय अतुल सरतापे हे पर्याय ठरू शकतात का ?
याची चाचपणी माळशिरस मतदारसंघात सुरू आहे. (Malshiras Vidhan Sabha)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?