Malvan Shivaji Maharaj Statue | मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यभरातून संताप; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Malvan Shivaji Maharaj Statue

सिंधुदुर्ग : Malvan Shivaji Maharaj Statue | मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (Saurabh Kumar Agrawal IPS) यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

हा पुतळा भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या दुर्घटनेची भारतीय नौदलाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. तसेच हा पुतळा तातडीने पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने नौदलाकडून पावलं उचलण्यात येत आहेत.

नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता.
तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता.
शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed