Mangalwar Peth Pune Crime News | पोटात चाकू मारुन घेऊन विवाहितेची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती अटकेत

women-dead-body

पुणे : Mangalwar Peth Pune Crime News | चारित्र्याचा संशय (Suspicion Of Wife Character) घेऊन पतीकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:च्या पोटात चाकू (Stabbing Case) मारुन आत्महत्या केली (Suicide Case). पूजा ऊर्फ सोनल विकी कांबळे (वय ३३, रा. नरपतगिरी चौक) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Married Woman Suicide)

याबाबत तिची आई लक्ष्मी ज्ञानेश्वर सोनवणे (वय ५४, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकी शंकर कांबळे (वय ३८, रा. बोलाई खाना, नरपतगिरी चौक) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन अटक केली आहे. ही घटना मंगळवार पेठेत २२ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा आणि विकी हे पती पत्नी असून विकी पुजा हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ करत होता. तसेच वारंवार वाद घालून भांडणे करीत होता. २२ जुलै रोजी रात्री विकी याने पुजाशी वाद घालण्यास सुरुवात केली. पतीच्या या त्रासाला कंटाळून पुजा हिने रागाच्या भरात स्वयंपाकाचा चाकू घेऊन स्वत:च्या पोटात वार करुन घेतले. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यात तिचा मृत्यु झाला. पुजावर अंत्यसंस्कार व अन्य विधी पार पाडल्यानंतर तिच्या आईने तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (PSI Vaibhav Gaikwad) अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC On Unauthorized Construction | कंपाउंडींग फी आकारून अनधिकृत बांधकाम नियमान्वीत करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिकेची सर्वोच्च न्यायालयात धाव

Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी

Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता

Chandrakant Patil-Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Murlidhar Mohol – Pune Flood | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

You may have missed