Manjri Pune Crime News | वर्गात जाऊन अल्पवयीन मुलाने काचेने गळ्यावर केला वार ! अल्पवयीन मुलगा जखमी, मांजरीमधील शाळेतील घटना
पुणे : Manjri Pune Crime News | वार्षिक कार्यक्रमाच्या संबंधाने झालेल्या वादाचा राग मनात धरुन एका १४ वर्षाच्या मुलाने वर्गात जाऊन १५ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथील सुभद्रा नर्सरी भोसले पब्लिक स्कुलमधील इयत्ता ९ वीच्या वर्गात मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघेही अल्पवयीन असून एकाच वर्गात शिकतात. त्यांच्यामध्ये वार्षिक कार्यक्रमाच्या संबंधातून शाब्दिक वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन १४ वर्षाच्या मुलगा हातात काचेचा तुकडा घेऊन वर्गात शिरला. त्याने ९ वी अ च्या वर्गात बसलेल्या मुलाच्या पाठीमागून येऊन फिर्यादी मुलाच्या गळ्यावर वार केला. ती काच त्याच्या गळ्याच्या उजव्या बाजुवर घुसवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १५ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरोपीला विरोध केला असता त्याने मी तुझी विकेट पाडेन असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे, गुन्हे निरीक्षक जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी भेट दिली़ आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokade) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध