Manoj Jarange Patil | विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल, बहुतांश जागांवर महायुतीची मुसंडी

Manoj Jarange Patil

पुणे: Manoj Jarange Patil | विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार महायुतीने २०० चा आकडा पार केला असून, भाजप सर्वाधिक १२५-१३० जागांवर जिंकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यातदेखील महायुतीला चांगले यश मिळताना दिसत आहेत. (Maharashtra Assembly Election Results 2024)

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे महायुती विशेषतः भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील बहुतांश जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येत आहे. महायुतीने आणलेली लाडकी बहीण योजना, योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे आणि पीएम मोदींच्या एक है तो सेफ है, या नाऱ्यांनी संपूर्ण हिंदू एकवटला आणि महायुतीला भरभरुन मतदान दिल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, लोकसभेप्रमाणे यंदाही मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण मराठवाड्यातील ४६ जागांपैकी ३६ जागांवर महायुती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed