Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा महायुती सरकारला इशारा, मला हलक्यात घेऊ नका, राजकारणात आलो तर तुमचा…
जालना : Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) विविध डावपेच टाकण्यास सुरूवात केली असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तत्पूर्वी, संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) आणि जरांगे यांच्यात बैठक झाली होती, त्यामुळे विधानसभेला नवी आघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे या हालचाली सुरू असतानाच मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून महायुती सरकारला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी म्हटले की, राजकीय भाषा बोलतो, कारण तुम्ही आरक्षण देत नाही. तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद करतो. आरक्षण देणार नसाल तर मग माझ्यापुढे पर्याय नाही.
जरांगे यांनी सरकारला इशारा देताना म्हटले की, माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकरांचे वाटोळे करणार असाल तर आता तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही. मला हलक्यात घेऊ नका, राजकारणात आलो तर तुमचा सुफडा साफ होईल.
मनोज जरांगे म्हणाले, मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका.
राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल. मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही.
मला त्यात ढकलू नका. राजकारणात आलो तर तुम्ही बांधलेली सगळी गणिते चुकणार आहेत. (Manoj Jarange Patil)
जरांगे म्हणाले, माझी राजकारणात यायची इच्छा नाही.
मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही.
मी शेतकर्यांपासून बारा बलुतेदारांपर्यंतचे प्रश्न मांडत आहे.
आता गोरगरीब मराठा शेतकर्यांचे राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन