Manoj Jarange Patil | सरकारला पुन्हा एक महिन्याचा वेळ देत मनोज जरांगेंचा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय

Manoj Jarange Patil

पुणे – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला (Mahayuti Govt) पुन्हा एक महिन्याचा वेळ देत आपले आमरण उपोषण स्थगित (Suspend Hunger Strike) करण्याचा निर्णय घेतला आहे. सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या व 13 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा अशी मागणी त्यांनी केली आहे. (Maratha Reservation)

जरांगे पाटील जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणला बसले आहेत. बुधवारी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, रात्री माझी तब्बेत खालावली असल्याने मराठा बांधवांना काळजी वाटत होती. त्यामुळे 40 जणांनी माझे हात पाय दाबून धरले आणि मला सलाईन दिले. आम्हाला आरक्षण आणि तुम्ही ही हवे आहात असे मराठा बांधवांनी सांगून माझी काळजी व्यक्त केली. सलाईल दिल्यामुळे उपोषणला अर्थ नाही. कारण सलाईन घेऊन उपोषण करणारा मी माणूस नाही. त्यामुळेच उपोषण स्थगित करीत असल्याची घोषण करत आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, सरकारच्या ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहे. आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरते. गावकर्यांनी देखील हे समजून घेऊन मला पाणी पिण्याचा, सलाईन घेण्याचा आग्रह करू नये. मी मरेपर्यंत उपोषण करायाला तयार आहे. राज्य सरकारला पुन्हा एकदा एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. 13 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, असा इशारा मनाजे जरांगे यांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil)

माझ्या विरोधात अटक वॉरंट काढणे हा फडणवीसांचा खेळ

एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे कोर्टाने जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. याबद्दल ते म्हणाले की, हा सगळा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा खेळ आहे. मला जेल मध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न आहे. बारा-तेरा वर्षांपूर्वीच वॉरंट आताच का निघालं? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद

You may have missed