Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | ‘तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार’, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘आम्ही मैदानात नव्हतो, तुला जरांगे आणि मराठा फॅक्टर…’

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil

बीड : Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीने या निवडणुकीत पहिल्यांदाच २३५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळवले. यामध्ये भाजपचा (BJP) १४८ जागांपैकी १३२ जागांवर, शिंदे गटाचा (Shivsena Shinde Group) ८५ जागांपैकी ५७ जागांवर तर अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) ५१ जागांपैकी ४१ जागांवर विजय झाला आहे.

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे (Maratha Andolan) महायुती विशेषतः भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील बहुतांश जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे. (Maratha Reservation)

भाजप सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा आहे. यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, ” मी समाजाला सांगितलं होतं, ज्याला निवडून आणायचं ज्याला पाडायचं त्याला पाडा. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचे काम करायचं नाही. राज्यात अर्धी गावं आमची आहेत. आमच्याशी बेईमानी करायची नाही.

मराठ्यांना खेळवायचे आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा नाही. एका जातीवर उमेदवार उभे करून मला माझी जात संपवायची नव्हती. गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतले असेल. माज मस्ती आली मराठ्यांशी बेईमानी केली तर पुन्हा आमरण उपोषण होणार आहे”, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, “आम्ही मैदानात नव्हतो, तुला जरांगे आणि मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल.
आयुष्य गेलं तरी हे जरांगे काय रसायन आहे हे कळणार नाही. राज्यात मराठ्यांचा नाद करू नये,
मराठ्यांनी शेवटी २०४ आणले. सरकार स्थापन झाले की, आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत.
आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही. तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार”, असा इशारा जरांगे यांनी फडणवीसांना दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”,
संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed