Manoj Jarange Patil | विधानसभा निवडणुकीबाबतची भूमिका 29 ऑगस्टला; मनोज जरांगे म्हणाले – “माझ्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर हे…”

Manoj Jarange Patil

पुणे : Manoj Jarange Patil | राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Issue) प्रश्न तापलेला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून (OBC Quota) आरक्षण देण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील करीत आहेत. त्यामुळे एकूणच मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरु झाला आहे. आता मनोज जरांगे विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही दिवसांपासून जरांगे यांची मराठा समाज शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील २९ ऑगस्ट ला मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत मनोज जरांगे म्हणाले, राजकारणातले डाव सांगायचे नसतात. २९ ऑगस्टला निवडणूक लढायची की नाही हे ठरवणार आहोत. माझ्या शरीरापेक्षा माझा समाज महत्वाचा आहे. समाजाला न्याय देणं गरजेचे आहे. सगळं आता सांगणार नाही. राजकारणात सगळ्या गोष्टी उघड्या करायच्या नसतात. २९ ऑगस्टला याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “ओबीसी-मराठा एकत्र आहे. गोरगरिब मराठ्यांचे, ओबीसींचे वाटोळे करू नका. राजकारण साध्य करण्यासाठी भांडणे लावू नका. किती निवडून आणायचे हे मी बघतो. मराठा समाजात फूट दाखवायची हे षडयंत्र देवेंद्र फडणवीसांचे आहे. मराठ्यांमध्ये फूट पडणार नाही. फडणवीसांचे स्वप्न कधीच साकार होणार नाही.

मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यात फूट पडणार नाही.
ओबीसीतून आरक्षण मिळवणारच, राखीव जागेतून आमच्या विचारांची माणसे निवडून आणणार.
सर्व जातीधर्माचे लोक आम्ही उभे करणार. ही सर्वसामान्यांची लाट असणार आहे”,
असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

“दरम्यान, माझ्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर हे समाजातील भावना आहे.
परंतु मी स्वार्थी नाही. मला त्याचा नाद नाही. समाजाला लुटून मी मोठा होणार नाही.
सर्व समाजातील गोर-गरीब सत्तेत आणायचे आहेत. आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करतोय.
लढायचं की पाडायचं हे २९ तारखेला अंतिम होणार आहे”,असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed