Manoj Jarange Patil Pune Rally | “मराठे एक नाहीत असं हीनवलं मात्र पुणेकरांनी दाखवून दिलं”; जरांगेंचा इशारा म्हणाले – “माजलेल्या वळूंना कात्रजचा घाट दाखवू”
पुणे : Manoj Jarange Patil Pune Rally | राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. मराठा समाजाला (Maratha Samaj) सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi Caste Certificate) देऊन ओबीसी प्रवर्गातून (OBC Quota) आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांच्या या मागणीसाठी तसेच राज्यात बिघडलेली सामाजिक परिस्थिती पाहाता त्यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली देखील काढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे कात्रज चौकात (Katraj Chowk Pune) जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव कात्रज चौकात उपस्थित होते महिलांची संख्या देखील लक्षणीय पाहायला मिळाली. जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असे ज्यांनी हीनवले त्यांना पुणेकरांनी दाखवून दिले, त्यांची पाठ थोपटायला हवी. दोन-चार दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिनवलं पण पुणेकरांनी एकजूट दाखवून दिली आहे. आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मी हटत नाही अशीच एकजूट दाखवा. मला यांनी घेरायचं ठरवलं आहे, पण छाताडावर पाय ठेऊन पुढे जाऊ.
मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आला आलाय तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू, तुमची लेकरं मोठी व्हावीत एवढाच माझा पण आहे माझा जीव गेला तरी मी मागे हटत नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी समस्त कात्रज ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे हजारोंच्या संख्येने कात्रज चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सकाळ पासूनच कात्रज व पंच क्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने कात्रज चौकात उपस्थित होते.
कात्रज घाट उतरताच भिलारेवाडी आणि मांगडेवाडी करांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले.
पुढे कात्रज चौकात येताच जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली एक मराठा लाख मराठा म्हणतं घोषणांनी परिसर दणाणला.
जरांगे पाटलांची शांतता रॅली कात्रज वरून जाणार असल्याने सकाळपासूनच कात्रज चौक व परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हाताला सलाईन लावलेल्या सुया तरीही जरांगे पाटलांचा उत्साह आणि याच उत्साहात त्यांनी कात्रज करांना संबोधित केले. (Manoj Jarange Patil Pune Rally)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी