Manoj Jarange Patil Rally In Pune | ‘मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का?’ ; जरांगेंच्या रॅलीत बॅनरची चर्चा
पुणे : Manoj Jarange Patil Rally In Pune | राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा ऐरणीवर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा शांतता रॅली सुरुवात केली आहे. आज पुण्यात शांतता रॅली पार पडणार आहे. या रॅलीला प्रत्येक जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज त्यांच्या रॅलीचा पुण्यात निरोप होणार आहे.
पुण्यात जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जरांगे यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. ही रॅली सारसबागेपासून बाजीराव रोडने जंगली महाराज रस्त्यावरून जाणार आहे तर डेक्कन याठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे.
शनिवारी (दि.१०) सोलापूर आणि सांगली येथे रॅली झाली. त्यानंतर आज (दि.११) ही रॅली पुण्यात दाखल होत आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. सारसबागेच्या चौकातही मोठमोठे फलक लावले असून, भगवे झेंडे पहायला मिळत आहेत.
तसेच डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मराठा बांधव हळूहळू सारस बागेसमोर जमा होत आहेत.
सारसबागेत जरांगे पाटील काही वेळात दाखल होणार आहेत. असंख्य मराठा बांधव याठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान याठिकाणी चिमुकल्याने धरलेला बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? का? का? हाच का न्याय? अशा स्वरूपाचा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. चिमुकला भविष्याच्या दृष्टीने सरकारकडे अशी मागणी करीत असल्याचे दिसून आले आहे.
मराठ्यांना शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना बेरोजगार रहावे लागते.
अनेक विद्यार्थी यामुळे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. असे जरांगे पाटलांनी सांगितले होते.
त्यामुळे सरकारने सरसकट मराठयांना आरक्षण दयावे अशी मागणी त्यांनी केली.
परंतु सरकारने अजूनही त्यांची मागणी पूर्ण न केल्याने राज्यातून मनोज यांनी शांतता रॅलीला सुरुवात केली आहे.
अशातच या चिमुकल्याने धरलेला बॅनर हायलाईट होऊ लागला आहे.
सरकार आजच्या रॅलीनंतर आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी