Manorama Dilip Khedkar | पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर

Manorama Dilip Khedkar

पुणे : Manorama Dilip Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन (Paud Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजाच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान दोन दिवसांपासून त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आज (दि.३) पूर्ण झाली आणि कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. (Manorama Dilip Khedkar)

मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 व्यवसाय. शेती मुळ रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता.दौड जि.पुणे)
यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Gold and Silver Rate | सोन्याने पुन्हा घेतला वेग, आता इतक्या किमतीला विकलं जातंय 22 आणि 24 कॅरेट गोल्ड; चांदीही चमकली

Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

You may have missed