Manorama Khedkar Arrest | पोलिसांशी हुज्जत, शेतकऱ्यांना दमदाटी; IAS पूजा यांच्या आई मनोरमा खेडकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे : Manorama Khedkar Arrest | आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (IAS Puja Khedkar) प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी करणाऱ्या पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमा यांच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ऑडी कारची नोटीस देण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांसोबत (Pune City Police) मनोरमा यांनी वाद घालून दमदाटी केली होती. तर बाणेर येथील बंगल्याबाहेर मेट्रोच्या कामात अडथळा आणल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यातही त्या पोलिसांसोबत हुज्जत घालत असल्याचे दिसून आले. (Pune Rural Police)
मनोरमा खेडकरला आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं (Pune LCB). स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलीस तिला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला दुपारी पौड येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर जी. बरडे यांच्या कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. महाडच्या हिरकणवाडी येथील पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आली आहे. तर मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 वाढवण्यात आले आहे. आधी शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता. (Manorama Khedkar Arrest)
पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी मनोरमा यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागताना अनेक कारणे सांगितले.
त्यामध्ये खेडकरसोबत तिचे पती दिलीप खेडकर यांच्यावरती देखील गुन्हा दाखल आहे,
मात्र ते देखील गायब आहेत. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या बाबतची माहिती पोलिसांना हवी आहे.
तर शेतकऱ्यांना धमकावताना वापरलेली पिस्तुल कुठे आहे, त्याची माहिती देखील पोलिसांना पाहिजे.
तसेच मुळशी तालुक्यामध्ये खेडकर कुटुंबाची नेमकी किती जमीन आहे
यासह इतर माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…