Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार
पुणे : Manorama Khedkar | मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन (Paud Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजाच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले होते. मनोरमा खेडकर यांना दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. कोठडीतील असुविधांविषयी त्यांनी कोर्टासमोर माहिती दिली. कोठडीत जेवण बेचव मिळत असल्याची तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे.
आपल्याला वेळेवर जेवण मिळत नसल्याचा आरोप मनोरमा खेडकर यांनी केला. चहा तर सकाळी नऊ वाजता देण्यात आला. जेवण दुपारी दीड वाजता देण्यात आले. कोठडीतील जागा ओली असल्याचा आरोप त्यांनी केला. कोर्टाने या सर्व आरोपांची दखल घेतली. कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाने मागितले. तसेच सगळ्या गोष्टी वेळेवर देण्याचे निर्देश दिले. न्यायालय पुढील सुनावणीवेळी सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. दरम्यान मनोरमा खेडकरच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत तपास पूर्ण करण्याच्या सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या. मनोरमा खेडकर यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला.
मनोरमा खेडकर यांच्यावर भारतीय दंड संहिता चे कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आर्म अँक्ट 3(25) नुसार गुन्हा दाखल झाला होता . याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 व्यवसाय. शेती मुळ रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता.दौड जि.पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Manorama Khedkar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत