Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
पुणे : Manorama Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे (IAS Puja Khedkar) नवनवे कारनामे समोर येत असतानाच आता तिचे आई-वडील ही अडचणीत आलेले आहेत. जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजाच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता चे कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आर्म अँक्ट 3(25) नुसार गुन्हा दाखल झाला. याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 व्यवसाय. शेती मुळ रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता.दौड जि.पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) फिर्याद दिली होती.
त्यानंतर काल गुरुवारी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली. पूजा खेडकर हिने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून (YCM Hospital) अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate) घेण्यासाठी याच कंपनीचा पत्ता आपलं निवासस्थान म्हणून दाखवलं होतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) खेडकर कुटुंबियांच्या कर थकविणाऱ्या कंपनीवर जप्तीची कारवाई करण्याची शक्यता आहे.
तसेच ही कंपनी रेड झोनमध्ये (Company In Red Zone) उभारली असल्याने या कंपनीवर पिंपरी चिंचवड महापालिका हातोडाही चालवू शकते, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील (Pradeep Jambhale Patil) यांनी दिली आहे. पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र काढताना जो पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर तिच्या आईची कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी महानगरपालिकेच्या रडावर असून कंपनी जप्त होणार असल्याची माहिती आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्योतिबा नगर,
तळवडे येथे असलेली थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नामक
या कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा २ लाख 77 हजार इतका कर मागील दोन वर्षापासून बुडविला आहे.
तसेच थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खेडकर कुटुंबीयांनी रेड झोनमध्ये उभारली असल्याने
खेडकर कुटुंबियांची ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…