Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)

Mantarwadi Pune Fire

पुणे : Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडी येथील एका पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग लागली. त्यात गोडावूनमधील सर्व पेंट, वातानुकुलीन यंत्रणा, फर्निचर, संगणक आदि साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. त्याचबरोबर दोन टेम्पो आणि दोन दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. (Mantarwadi Pune Fire News)

https://www.instagram.com/p/DBsiqHAJ-9W

मंतरवाडी येथील गोडावूनला आग लागल्याची वर्दी पहाटे २ वाजून २ मिनिटांनी अग्निशामन दलाला मिळाली. त्याबरोबर फायरगाड्या व टँकर रवाना करण्यात आले.

मंतरवाडी येथील निपॉन कंपनीचे गोडावून होते. १५ हजार ७०० स्क्वेअर फुट व अंदाजे १० फुट भिंत असलेले पेंटचे गोडावूनने पेट घेतला होता. त्यात औद्योगिक व घरगुती अशा अनेक प्रकारे वापरला जाणारा पेंट होता. त्याने भीषण स्वरुप धारण केले होते. जवानांनी तातडीने आगीवर चारही बाजूने पाण्याचा माराण सुरु करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये कोणी नसल्याची खात्री करुन आगीवर एक तासाच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळविले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले होते.

या आगीत गोडावूनच्या पत्र्याचे शेड, मोठे लोखंडी गज वाकले गेले. तसेच तेथील दोन टेम्पो
व दोन दुचाकी वाहने जळून गेली. गोडावूनमधील पेंट, वातानुकुलित यंत्रणा, फर्निचर, संगणक आदी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, अनिल गायकवाड यांच्यासह सुमारे ५० जवानांनी यामध्ये सहभाग घेतला.
अग्निशमन दलाकडून काळे पडळ, हडपसर, बी टी कवडे रोड, कोंढवा, मध्यवर्ती,
पीएमआरडीए, अमनोरा अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहने,
वॉटर टँकर आणि खासगी दहा टॅँकरने या कारवाईत भाग घेतला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

You may have missed