Market Yard Pune Crime News | विसार पावती एकाबरोबर, जमीन विकली दुसर्याला ! 20 लाखांची फसवणूक करणार्या कुटुंबावर गुन्हा दाखल

पुणे : Market Yard Pune Crime News | सासवड (Saswad) येथील जमीन विकत देण्याचा ठरवून २० लाख रुपये घेऊन विसार पावती केली. प्रत्यक्षात जमिनीची दुसर्यांना विक्री करुन फसवणुक (Cheating Fraud Case) करणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Market Yard Pune Crime News)
याबाबत विशाल विनोदराव कुकडे (वय ४२, रा. बी टी कवडे रोड, घोरपडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिता प्रकाश बोरकर (वय ६३), इंद्रजित बोरकर (रा. कांचनगंगा सोसायटी, बिबवेवाडी कोंढवा रोड) आणि सायली फरगडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजित त्यांची आई अनिता बोरकर व बहिण सायली फरगडे यांनी सासवड येथील त्यांच्या वाटणीत आलेली ८ एकर २६ गुंठे जमिनीची ५ कोटी २५ लाख रुपयांना फिर्यादी यांना विक्री करण्याचे ठरवले. त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून २० लाख रुपये घेऊन सप्टेबर २०२२ मध्ये विसार पावती केली.
त्यानंतर त्यांना काही न कळविता़ ही मिळकत रमेश लक्ष्मण बोरावके (रा. सासवड),
सचिन दामोदर भोंडे, अनिल पंढरीनाथ जगताप, दत्तात्रय किसन कामठे (रा. आंबेगाव),
अनिल दिनकर शेडगे यांच्याबरोबर सासवड येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर साठे खत करुन विक्री केली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांची २० लाख रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन