Market Yard Pune Crime News | मार्केटयार्ड: घरफोडीच्या ठिकाणी सापडलेल्या ठशावरुन उत्तर प्रदेशातून चोरटे जेरबंद; १२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत

Market Yard Police Station

पुणे : Market Yard Pune Crime News | कोणताही गुन्हा घडला तर घटनास्थळावर गुन्हा केलेल्याकडून त्याने मागे काही माग ठेवला आहे का याची तपासणी केली जाते. त्यात महत्वाचा भाग गुन्हेगाराच्या हाताचे ठसे मिळतात का हे पाहिले जाते. मार्केटयार्ड येथील एका सोसायटीमध्ये घरफोडी झाली. पोलिसांना घरात चोरट्याचे दोन ठसे मिळाले. या ठशावरुन पोलिसांनी चोरट्याचा माग काढत उत्तर प्रदेशातील गावातून त्याला अटक केली. त्यांच्या साथीदाराला पकडून त्यांच्याकडून १२ लाख ७७ हजार ६८१ रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. (Arrest In House Burglary)

छोटू ऊर्फ सिदु भय्यालाल राजपूत (वय ३०, रा. शिंदे वस्ती, कोथरुड मुळ गाव कानेमई अझुवा, ता. सिराथु, जि. कौशाम्बी, उत्तर प्रदेश) आणि अनिलकुमार रामसिंह बल्ली राजपूत (वय २७, रा. बलपूर्वा, अझुवा, सैनी, थाना ता. सिराथु, जि. कौशाम्बी, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मार्केटयार्ड येथील संदेश सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करुन कपाटामधील सोन्याचे २९० ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे दागिने, २५ हजार रुपये रोख असा १४ लाख ५८ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सहायक पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (API Vinayak Gaikwad) यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासणी केली. त्यात चोरट्यांचे दोन ठसे मिळाले होते. त्या ठशांची तपासणी केल्यावर त्यापैकी एक सिद्धु रजपूत याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा पूर्व इतिहास पाहिल्यावर त्यांच्या विरुद्ध मुंबई, पुणे शहरात एकूण ११ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. (Market Yard Pune Crime News)

पुण्यातून तो पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा गावाकडील पत्ता मिळविला. तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुनिल भापकर व त्यांच्या सहकार्‍यांनी उत्तर प्रदेशात जाऊन त्याला ताब्यात घेतले. घरफोडीतील ऐवजाविषयी चौकशी केल्यावर त्याने त्याचा साथीदार अनिकुमार बल्ली याच्याकडे असल्याचे सांगितले. त्याला अटक करुन पोलिसांनी १२ लाख ६६ हजार ७९४ रुपयांची २४ तोळ्याची लगड व १० हजार ८९५ रुपयांचे चांदीचे दागिने असा १२ लाख ७७ हजार ६८९ रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja),
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे (ACP Dhanyakumar Godse),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे (PI Maya Devre), पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे (PI Rahulkumar Khilare)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे (API Madan Kamble),
पोलीस उपनिरीक्षक सुनिल भापकर (PSI Sunil Bhapkar), पोलीस अंमलदार अमित जाधव, हिरवाळे,
थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, आशिष जाधव यांच्या पथकाने केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed