Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

FIR

पुणे : Market Yard Pune Crime News | अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्याचा व्हिडिओ काढून फिर्यादीकडून तिच्या आईचे २० लाख ६६ हजार ८२० रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन परत करण्यास टाळाटाळ केली. घरात दागिने नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

याबाबत एका १५ वर्षाच्या मुलीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्ष महेंद्र महाडिक Harsh Mahendra Mahadik (वय २१, रा. गोकुळनगर, कात्रज – Gokul Nagar Katraj) याच्याविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा (POCSO Act) दाखल केला आहे. हा प्रकार सॅलेसबरी पार्क, मार्केटयार्ड, कल्याणीनगर येथील हॉटेलमध्ये ११ डिसेबर २०२२ पासून १० जुलै २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हर्ष महाडिक यांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पाट्या केल्या. त्यावेळी हर्ष याने आपल्यावर खूप कर्ज झाले आहे. ते फेडण्यासाठी काही तारण ठेवावे लागणार आहे, असे सांगितले. फिर्यादी हिने आईच्या नकळत तिचे दागिने एक एक करुन हर्षला दिले. अशा प्रकारे वेगवेगळी कारणे देऊन हर्ष याने तिच्याकडून आईचे २० लाख ६६ हजार ८२० रुपयांचे दागिने घेतले.

काही दिवसांपूर्वी घरात दागिने नसल्याचे आईच्या लक्षात आले. तिने फिर्यादी मुलीला विचारले, तेव्हा तिने आपण हर्षला दिल्याचे सांगितले.
फिर्यादी हिने दागिने परत मागितल्यावर हर्ष याने फिर्यादीच्या बोटाला चावा घेऊन हाताने मारहाण केली.
दागिने परत न दिल्याने तिने आता फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. (Market Yard Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला