Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग; मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त

पुणे : Market Yard Pune Police News | बेकायदा गॅस रिफिलिंग (Illegal Gas Refilling) करत असताना गॅस गळती होऊन त्यात २२ गॅस सिलेंडरचा स्फोट कात्रज परिसरातील अंजलीनगर येथे झाला होता. या घटनेपासून बोध न घेताच मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगरमधील गल्ली नं. ४ येथे एका छोट्या खोलीत बेकायदेशीरपणे मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. आंबेडकरनगर झोपडपट्टीत अतिशय दाट लोकवस्तीमध्ये एका छोट्याश्या खोलीमध्ये हे बेकायदा कृत्य सुरु होते. तेथे काही दुर्घटना घडली असती तर अग्निशमन दलाच्या गाडीला आत जाण्यासही जागा नाही. तेथे जाण्यासाठी अतिशय निमुळता रोड आहे. (Market Yard Pune Crime News)
https://www.instagram.com/reel/DF9k-fCJ9K2/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
याबाबत पोलीस हवालदार राजेश श्रीधर थोरात यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बंदेनवाज ऊर्फ सलीम गुलाब शेरीकर (वय ३५, रा. गल्ली नं. ४, आंबेडकरनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आंबेडकरनगर येथील दावल एंटरप्राइजेस या दुकानातील एका खोलीतून पोलिसांनी ५ मोठे गॅस सिलेंडर आणि १२ छोटे गॅस सिलेंडर जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड पोलिसांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, आंबेडकरनगरमधील गल्ली नंबर ४ येथे बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करुन मिळतो. ही बातमी मिळताच मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे व पोलीस अंमलदार हे तेथे पोहचले. त्यांना दावल एंटरप्राईजेस या दुकानांमध्ये बेकादेशीरपणे घरगुती वापराच्या मोठ्या गॅस सिलेंडमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये निष्काळजीपणे, गॅस रिफिलिंग करुन देण्याचे काम सुरु होते. गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य मिळून आले. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे (API Chetan More) तपास करीत आहेत. (Market Yard Pune Police News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा