Matkaking Nandu Naik | पुणे: ‘मटकाकिंग’वरील MPDA कारवाई गृह विभागाने केली रद्द; अवघ्या 8 दिवसातच नंदू नाईक कारागृहातुन बाहेर

Nandu-Naik-1

पुणे : Matkaking Nandu Naik | नंदू ऊर्फ नंदकुमार बाबूराव नाईक (वय-७२) याच्यावर पुणे पोलिसांनी स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई केली होती. मात्र त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ही कारवाई रद्द केली. त्यामुळे अवघ्या ८ दिवसातच नंदू नाईक कारागृहातून बाहेर आला आहे. (MatkaKing Nandu Naik)

खडक पोलिस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीत शुक्रवार पेठ परिसरात नंदू नाईक बेकायदा मटका, जुगार व इतर धंदे चालवत होता. त्याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात एकूण ६३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २०२१ पासून मटका आणि जुगारासंदर्भात १२ गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी वेळोवेळी छापे टाकून त्याच्या जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केली. (Gambling Den)

मात्र तरीही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १७ मार्चला नाईकला नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Jail) स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला नागपूर कारागृहात रवाना देखील करण्यात आले होते.

काही वर्षांपूर्वी एका प्रकरणात बंडू आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली होती. त्यात नंदू नाईककडून आंदेकर टोळीला आर्थिक रसद असल्याच्या कारणावरून त्याच्यावरही मकोका कारवाई केली होती. या प्रकरणातही नाईकला जामीन मिळाला होता.

याबाबतचे नियम काय आहेत?

  • एमपीडीए कारवाई झाल्यानंतर संबंधिताला राज्य सरकार आणि सर्वोच न्यायालयात दाद मागण्याची संधी.
  • या पातळ्यांवर दाद मागितल्यानंतर एमपीडीएच्या कायद्यानुसार कारवाई झाली का, याची तपासणी होते.
  • त्यानंतर राज्य सरकार किंवा न्यायालय संबंधितावरील कारवाई रद्द किंवा कायम ठेवण्याचा निर्णय घेते.

You may have missed