Maval Assembly Election 2024 | मावळात सुनील शेळके-बापू भेगडेंचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत धक्काबुक्की
लोणावळा: Maval Assembly Election 2024 | यंदा राज्यात मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke MLA) उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात बंडखोरी करत बापू भेगडेंनी (Bapu Bhegade) आव्हान दिलं आहे. दरम्यान मावळातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे.
लोणावळ्यात सुनील शेळके आणि बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आमदार सुनील शेळके लोणावळयात प्रचार करण्यासाठी गेले होते. लोणावळ्यातील राम मंदिरात शेळके यांनी दर्शन घेतले.
दरम्यान अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांच्यावर आरोप केले, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंदिरातून निघून जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दीक वाद झाला. राम मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान दोन्ही बाजूनी घोषणाबाजी सुरु होती. त्यानंतर परिसरात तणाव वाढला होता.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. शेळके- भेगडे यांचे समर्थक समोरासमोर आल्याने धक्काबुक्की झाली. भेगडे यांच्याकडे कुठवाही मुद्दा नसल्याने ते मतदारसंघात दहशत निर्माण करीत आहेत, असा आरोप सुनील शेळके यांनी केला. भेगडे यांनीही शेळकेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)