Maval Assembly Election 2024 | राष्ट्रवादी अजित पवार गटाला मावळ तालुक्यात मोठा धक्का; बड्या नेत्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

Sunil Shelke-Bapu Bhegade

मावळ: Maval Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांची नाराजीही समोर आली आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुनील शेळके (Sunil Shelke) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आता त्यांच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातून इच्छुक असलेले बापू भेगडे (Bapu Bhegade) यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती मिळत आहे.

उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर बापू भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रामराम केला. त्यामुळे आता अजित पवार यांना मावळ तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. दरम्यान मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे, अशी लढत होणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group First List For Assembly | शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर,
आदित्य ठाकरेंसह 65 जणांचा समावेश; जाणून घ्या

Pune ACB Trap News | 5 लाख रुपयांची लाचेची मागणी करुन 2 लाखांची लाच घेताना
महावितरणचा कार्यकारी अभियंता जाळ्यात

Eknath Shinde-Amit Shah | एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांचा सल्ला धुडकावला

You may have missed