Maval Assembly Election 2024 | मावळात भाजपचा सांगली पॅटर्न, अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी रणनीती

Sunil Shelke - Bala Bhegade

पुणे: Maval Assembly Election 2024 | मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti Candidate) सुनील शेळके (Sunil Shelke) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार असणार आहेत. मात्र या उमेदवारीला मावळमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत सुनील शेळकेंचा पराभव करणे आणि बापू भेगडे (Bapu Bhegade) यांना निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार माजी मंत्री बाळा भेगडे यांनी घेतला आहे. मावळमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर बाळा भेगडे म्हणाले, “मावळची जनता आणि भाजपा कार्यकर्त्याची ताकद ही येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल. निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता काय असतो हे मावळ जनतेच्या आशीर्वादातून प्राप्त होईल. मी योग्य वेळी योग्य प्रयोग करेन.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व किल्ले जिंकले, त्यांची आदर्श भूमिका मावळचे मावळे म्हणून आम्ही स्वीकारली आहे. आम्ही आमच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मावळ तालुक्यातील भाजपा टिकली पाहिजे या भूमिकेतून आम्ही कामाला लागलो आहोत”, असे भेगडे यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले,” तसेच हा केवळ विधानसभेपुरता विषय नाही.पाच वर्ष आम्ही जे भोगलंय, कार्यकर्त्यांनी जे सहन केलंय त्याची प्रचिती म्हणून हे होत आहे. अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना मावळच्या जनतेच्या आशीर्वादावर निवडून आणणं एवढेच आमचे लक्ष्य आहे”, असं बाळा भेगडे यांनी सांगितलं.

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील शेळकेंना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी राजीनामा दिला. “पक्षाच्या स्थापनेपासून मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तालुक्यात काँग्रेस रुजवणारं माझं कुटुंब आहे. आम्ही सगळे निष्ठावंत मंडळी, दादांना कल्पना आहे. मी अपक्ष निवडणुकीत उभा राहणार आहे. जनतेच्या विश्वासावर मी हा निर्णय घेतला आहे”,असं बापू भेगडेंनी सांगितले.

मतदारसंघातील या राजकीय हालचालींवर सुनील शेळकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले,” महायुतीत ही जागा आम्हाला सुटावी यासाठी अजित दादा आग्रही होते.
एकदा निर्णय झाल्यानंतर भाजपा नेते आणि कार्यकर्ते पक्षाचं काम करतात.
कारण मीदेखील त्या पक्षात काम केले आहे.

आम्ही एकत्रितपणे काम केले आहे. महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार नाही.
आमच्यातलाच कुणीतरी उमेदवार मिळावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. महायुतीतील इच्छुक
जर कुणी उभं करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही नाराजांची समजूत काढू”,
असं सुनील शेळके यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू

You may have missed