Maval Assembly Election 2024 | मावळ विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

मावळ : Maval Assembly Election 2024 | मावळ विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. महायुतीकडून (Mahayuti) अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke MLA) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार पक्षातीलच नेते बापूसाहेब भेगडे (Bapu Bhegade) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करताच त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) पाठिंबा दर्शविला आहे. भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे (Bala Bhegade) आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे (Ganesh Bhegade) यांनीही पदांचे राजीनामे देऊन भेगडे यांना समर्थन दिले आहे.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group) कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका सुरुवातीला जाहीर करण्यात आली होती. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित असून, त्याचे नाव दोन दिवसात जाहीर केले जाईल, असा दावाही करण्यात आला होता.
मात्र, कोणत्या पक्षाला मावळची जागा सोडायची, यावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला. या परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बापू भेगडे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या सूचनेनुसार हा पाठिंबा देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी दिली आहे. दरम्यान मावळातील यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची आणि चर्चेची होणार आहे. (Maval Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण