Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंचं टेन्शन वाढलं; मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग
मुंबई: Maval Assembly Election 2024 | मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) सुनील शेळके (Sunil Shelke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) आहेत. मात्र या उमेदवारीला मावळमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. (Maval Assembly Election 2024)
आगामी विधानसभा निवडणुकीत सुनील शेळकेंचा पराभव करणे आणि बापू भेगडे (Bapu Bhegade) यांना निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जाहीर भूमिका मांडली आहे.
मविआच्या जागावाटपात (MVA Seat Sharing Formula) मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) वाट्याला येणार होता. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शरद पवार गटाने त्याठिकाणी उमेदवार न देता बापू भेगडेंना पाठिंबा दिला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते बापू भेगडेंच्या प्रचारात सक्रिय झाले असून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही भेगडेंना पाठिंबा देत शेळकेंना कोंडीत पकडत आहे. त्यामुळे, अजित पवारांच्या पठ्ठ्याला कोंडीत पकडण्यासाठी तयार झालेला मावळ पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे.
मावळ पॅटर्नला राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ही पाठिंबा दर्शवला असून हा पॅटर्न सत्यात
उतरवण्यासाठी भाजपाचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी स्वतः राज ठाकरेंची भेट घेतली.
बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने मनसेच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला जातोय.
त्यामुळे अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा