Maval Assembly Election 2024 | बापू भेगडे निवडून आल्यास कोणाला पाठिंबा देणार? मावळ तालुक्यात उत्सुकता

Bapu Bhegade

मावळ: Maval Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान मावळ पॅटर्नची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke MLA) पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र या मतदारसंघात अजित पवार गटातीलच नेते बापू भेगडे (Bapu Bhegade) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विशेष म्हणजे या मतदारसंघात स्थानिक भाजप (BJP Leaders In Maval) नेत्यांनी बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटानेही (Sharad Pawar NCP) याठिकाणी आपला उमेदवार न देता बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केला आहे. काल स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनीही (MNS) पत्रकार परिषद घेत बापू भेगडेंना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान बापू भेगडे निवडून आल्यास सरकार बनवण्यासाठी कोणाला पाठिंबा देणार, हे बापू भेगडे यांनी आधी जाहीर करावे, अशी मागणी केली जात आहे. भाजप व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते बापूसाहेबांच्या व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र दिसत असले तर बापूसाहेबांना मत म्हणजे नेमके कोणाला मत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष म्हणून निवडून येऊन महायुतीला सरकार स्थापनेसाठी मदत करणार असतील, तर आम्ही बापूसाहेब भेगडे यांचे काम करणार नाही, असे काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात द्विधा मनस्थितीत असलेल्या कार्यकर्ते व मतदारांचे शंका निरसन बापू भेगडे कशाप्रकारे करणार, या विषयी तालुक्यात उत्सुकता आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश

You may have missed