Maval Pune Crime News | पुणे: निवडणुकीच्या काळात मावळ हादरलं ! भाजप पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या
पुणे / मावळ: Maval Pune Crime News | निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मावळमधील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मावळ तालुका भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे सरचिटणीस निलेश दत्तात्रय कडू (वय. ३० रा. सावंतवाडी, ता. मावळ) यांची हत्याराने आणि दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली आहे. (Maval Murder Case)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि.३१ ऑक्टोंबरला मावळ तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाचीवाडी गावाच्या प्रवेशद्वाराशेजारील मोकळ्या जागेवर रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Maval Pune Crime News)
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे पथक सकाळपासूनच घटनास्थळाची पाहणी करत असून पुढील तपास सुरू आहे. तर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यातही घेतले आहे.
अजून काही आरोपींचा शोध लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. निलेश कडू हे भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी होते. त्यांच्या खूनामागचे कारण समजू शकले नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा