Maval Pune News | धर्मेंद्र- हेमामालिनीला न्यायालयाचा दिलासा; मावळातील जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याचा दावा फेटाळला
मावळ: Maval Pune News | अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमामालिनी (Hema Malini) यांनी मावळ तालुक्यात खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याच्या मागणीसाठी मूळ मालकाच्या नातवांनी केलेला दावा वडगाव-मावळ न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीश राहुल शिंदे (Judge Rahul Shinde) यांनी फेटाळून लावला. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
वडगाव मावळ तालुक्यात धर्मेंद्र देओल, त्यांची पत्नी हेमामालिनी यांनी जमीन खरेदी केली होती. त्यांनी श्रीकांत खिरे यांच्याकडून ही जमीन खरेदी केली होती. १९८५ मध्ये खिरे यांनी या जमिनीची विक्री त्यांना केली होती. जमिनीच्या मूळ मालकाचे नातू किसन मानकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करण्यात यावे, असा दावा वडगाव मावळ न्यायालयात केला होता.
या खटल्यात धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या वतीने ॲड. अमित राठी (Adv Amit Rathi), ॲड. राजू शिंदे (Adv Raju Shinde) , ॲड. आदित्य जाधव (Adv Aditya Jadhav) यांनी बाजू मांडली. संबंधित दावा कालबाह्य असल्याचा अर्ज ॲड. राठी यांनी न्यायालयात दाखल केला. जमिनीच्या मूळ मालकांना १९८५ मध्ये जमिनीच्या खरेदीखताची माहिती होती. त्या वेळी त्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अवलंबली नाही. आता ३७ वर्षांनंतर पैसे उकळण्यासाठी हा दावा दाखल करण्यात आला आहे, असे ॲड. राठी यांनी युक्तिवादात सांगितले.
खिरे यांनी वसंत मानकर (Vasant Mankar), शिवाजी मानकर (Shivaji Mankar)
आणि यमुनाबाई जांभुळकर यांच्याकडून १२ जून १९८५ रोजी जमीन खरेदी केली. संबंधित जमिनीचा आणखी एक विक्री करार खिरे यांच्या नावे करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्यांनी खिरे यांच्याशी जमिनीचा करार केला. त्यामुळे खिरे यांच्या नावे केलेले विक्रीपत्र बनावट आहे. खरेदीखत रद्द करण्यात यावे. असा युक्तिवाद मानकर यांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या बाजूने निकाल दिला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?