Mayor Reservation Draw | महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला; राज्यातील 29 महापालिकांसाठी विशेष बैठक
मुंबई : Mayor Reservation Draw | पुणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी, २२ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. नगर विकास विभागाच्या अधिकृत पत्रानुसार, ही आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत सर्व संबंधित महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, राज्यातील महापालिकांच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विशेषतः पुणे, मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड आणि ठाणे महापालिकांमधील आरक्षणाबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिकेत २०१७ मध्ये महापौर पदाचे आरक्षण खुल्या गटासाठी होते.
