MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)
पुणे : MCOCA Action On Enjoy Group | स्वारगेट (Murder In Swargate) येथे २०१३ मध्ये झालेल्या कुणाल शंकर पोळ (Kunal Pol Murder) याचा खून करणार्या आरोपींचा खून करण्याचा प्रयत्नात असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या ८ आरोपींविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) पाठविलेल्या मोक्का प्रस्तावास अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil) यांनी मंजुरी दिली आहे. (Pune Police MCOCA Action)
https://www.instagram.com/reel/C_qI0cCp6ml/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अमित म्हस्कु अवचरे ऊर्फ औचरे (वय २७, रा. फुरसुंगी, हडपसर), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६, रा. गंज पेठ), लतिकेश गौतम पोळ (वय २२, रा. कात्रज कोंढवा रोड), शुभम ऊर्फ मेंटर अनिल जगताप (वय २७, रा. भेकराईनगर, हडपसर), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४, रा. भारती विद्यापीठ), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७, रा. भेकराईनगर, फुरसुंगी), बसर्या ऊर्फ बसवराज स्वामी (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DAINwPCprDz
फिर्यादी हे २९ ऑगस्ट रोजी सासवडहून पुण्यात येत असताना कोलवडीकडे जात होते. त्यावेळी जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादी यांच्यावर हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. लोणीकंद पोलिसांनी आरोपींना अटक केली. ते अशाच प्रकारे संघटितपणे वारंवार गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.
https://www.instagram.com/p/DAGgS5oJ9rK
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे (API Ravindra Godse), पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला. मनोज पाटील यांनी त्याची छाननी करुन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonawane) तपास करीत आहेत.
https://www.instagram.com/p/DAGcj3DCHPH
पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे,
पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी ही कामगिरी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAGYk9BpBim
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा