MD Drug Smuggling Racket Busted | एमडी ड्रग्जची तस्करी; रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश

Sangli Crime News

कोल्हापूर : MD Drug Smuggling Racket Busted | एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शाहूपुरी पोलिसांनी शनिवार (दि.२१) पर्दाफाश केला आहे. सांगलीतील एका हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या ठोकून त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीचा २९ ग्रॅम अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. शाहू मार्केट यार्डातील वाळू अड्डा परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.

अथर्व संजय सरवदे (वय-२४, रा. रतननगर रोड नं.१२, विश्रामबाग, सांगली), संतोष काशीनाथ पुकळे (वय-३०, लक्ष्मीनगर, जुना कुपवाड रोड, शिवमंगल अपार्टमेंट प्लॉट नं.१, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. गोवा, कर्नाटक व्हाया कोल्हापूरसह सांगलीला एमडी ड्रग्जची तस्करी करीत असल्याची माहिती आहे.

https://www.instagram.com/p/DD4FjVYTuQM/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. संशयित सरवदे याने अमली पदार्थांचा साठा शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातून कोल्हापुरात आणला होता. संतोष पुकळे याच्यामार्फत या साठ्याची मार्केट यार्ड येथील वाळू अड्डा परिसरातून सांगलीकडे तस्करी करण्यात येणार होती.

याची माहिती मिळताच पोलिस पथकाने रात्री उशिरा सापळा रचून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
संशयितांचे गोवा व कर्नाटक कनेक्शन प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. साठा गोव्यातून कोणाकडून उपलब्ध झाला,
याची माहिती घेण्यात येत आहे. (MD Drug Smuggling Racket Busted)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार