MH Assembly Election Results 2024 | महायुतीच्या लाटेत शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड ढासळला, 56 पैकी 46 जागांवर महायुती विजयी
पुणे : MH Assembly Election Results 2024 | विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला (Mahayuti) बहुमताने कौल दिला. लोकसभेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेने मविआला नाकारल्याचे चित्र आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने महायुतीच्या बळावर 56 पैकी 46 जागा जिंकत गडाला सुरुंग लावला आहे.
अलिकडच्या तीन दशकांत याठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. पुणे जिल्ह्यातील 21 पैकी अकरा जागा मागील निवडणुकीत जिंकत विभागातील एकूण 27 जागी राष्ट्रवादी विजयी झाली होती. पवार यांच्या पक्षाने कालच्या निकालात केवळ सात जागा जिंकल्या. सातारा व कोल्हापूर या त्यांच्या बालेकिल्ल्यात एकही जागा मिळाली नाही.
काँग्रेसची अवस्था त्याहून दारुण पराभवाने विकलांग झाली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विश्वजित कदम यांची एकमेव जागा मिळाली व उबाठा दोन ठिकाणी जिंकल्याने महाआघाडीला केवळ दहा जागा मिळाल्या.
याउलट भाजपने दोन डझन जागा जिंकून मुसंडी मारली.
अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) 5 आणि शिंदे सेना (Shivsena Shinde Group) 7 अशा 42 जागा जिंकून मोठी मजल मारली.
इतर जागांमध्ये जनसुराज्यच्या दोन आणि दोन्ही अपक्ष युतीचेच समर्थक आहेत.
ही बेरजेची उडी 46 वर जाते. काँग्रेस विरोधकांना आजवर मिळालेले सर्वोत्तम यश आहे. (MH Assembly Election Results 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”,
संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट