MH Assembly Election Results 2024 | महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक फटका कोणाला? आकडेवारीसह राजकीय स्थित्यंतरे कशी बदलली? जाणून घ्या

Mahavikas Aghadi

पुणे : MH Assembly Election Results 2024 | लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशाच्या तुलनेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाकडे अगदी देशाचं लक्ष असतं. मागील काही वर्षात राजकीय स्थित्यंतरे अगदी वेगाने बदलत गेली. २०१९ च्या विधानसभेनंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Shivsena UBT), राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar NCP), काँग्रेस (Congress) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन झाली.

या आघाडीत समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व काही अपक्ष आमदार सुद्धा होते. या आघाडीने राज्याचे राजकारणच बदलून टाकल्याचे पाहायला मिळाले. या मविआ प्रयोगाचा फायदा आणि तोटा नेमका कोणाला झाला याबाबत राजकीय जाणकार मांडणी करताना दिसतात.

महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आणि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. महाविकास आघाडीचे अडीच वर्ष सरकार चालले. यानंतर जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका मविआ सरकार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.

विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बंड केले. शिंदे भाजपसोबत गेले. मविआ सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद समोर आला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष गेला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर एक वर्षातच राष्ट्रवादीत फूट पडल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार ५० आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govt) सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? हा प्रश्न उपस्थित झाला. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आले.

त्यानंतरची लोकसभा निवडणुक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti) याप्रमाणे झाली. राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी सहानभुतीची लाट असल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीत मविआला मोठे यश मिळाले. मविआ ला ३० अपक्ष १ मिळून ३१ तर महायुतीला १७ जागा मिळाल्या.

लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मत मिळाली?

भाजपा: २६.१८%

काँग्रेस: १६.९२ %

राष्ट्रवादी (शरद पवार गट): १०.२७ %

राष्ट्रवादी (अजित पवार गट): ३.६० %

शिवसेना (शिंदे गट): १२.९५ %

शिवसेना (ठाकरे गट): १६.७२ % याप्रमाणे मते मिळाली.

मात्र त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तर मविआला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळालं.

भाजपा: २६.७७%

काँग्रेस: १२.४१ %

राष्ट्रवादी (शरद पवार गट): ११.२८%

राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०९.०१ %

शिवसेना (शिंदे गट): १२.३८ %

शिवसेना (ठाकरे गट): ०९.९६% याप्रमाणे मते मिळाली.

पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कमी जागा लढवल्या होत्या. पक्षाने १० जागा लढवून ८ जागांवर विजय मिळवला होता. राज्यात मविआचे सरकार कोसळल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाआणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा धक्का बसला.

आता या पराभवातून सावरून पुढे वाटचाल करण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाला नव्याने ऊर्जा देण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची काय रणनीती असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (MH Assembly Election Results 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत