MH Assembly Election Voting Turnout | विधानसभेच्या मतदानाच्या आकडेवारीवरून माजी निवडणूक आयुक्तांकडून चिंता व्यक्त; म्हणाले – ‘दुसऱ्या दिवशी डेटा कसा बदलू शकतो’
मुंबई: MH Assembly Election Voting Turnout | राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम (EVM) आणि मतदानाच्या आकडेवारीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राज्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी (CEC SY Quraishi) यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाची तात्पुरती आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यातील फरकाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
२० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतदानाची टक्केवारी ५५ टक्के दाखविण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी ही टक्केवारी ६७ टक्क्यांवर गेल्याचे दाखवण्यात आले. मतदानाची ही टक्केवारी गेल्या तीन दशकातील सर्वोच्च होती.
एस. वाय. कुरैशी हे २०१० ते २०१२ या कालावधीत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ” मी जे काही पाहतोय ते नक्कीच चिंताजनक आहे. ही आकडेवारी रिअल टाइममध्ये अपडेट केली जाते. जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा निवडणूक अधिकारी मतदाराची उपस्थिती नोंदवतात. तेथे १७ ए फॉर्म असतो.
मतदानाच्या दिवशी शेवटी १७ सी अर्जात दिवसभरातील मतदानाची आकडेवारी नोंदवली जाते. तसेच त्यावर निवडणूक अधिकारी उमेदवाराच्या एजंटच्या सह्या घेतात. फॉर्म १७ सी मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले याची नोंद केली जाते. हा रिअल- टाइम डेटा त्याच दिवशी प्रकाशित केला जातो. मग दुसऱ्या दिवशी डेटा कसा बदलू शकतो ते मला समजत नाही”, असा सवाल माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी उपस्थित केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी