Milk Price Hike News | गायीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ; 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार

मुंबई : Milk Price Hike News | शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गायीच्या दुधाच्या (Cow’s milk) खरेदी किमतीत दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळने (Gokul) गायीच्या दुधाच्या खरेदी किमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याची मोठी भेट मिळाल्याची चर्चा आहे.
गायीच्या दुधाला प्रतिलिटर 32 रुपये इतका दर राहणार असून, खरेदी दराची वाढ ही 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, देशभरात सर्वत्र ईदचा (Ramadan Eid) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान सोमवारी, आज साजरा होणाऱ्या ईद सणाच्या तयारीसाठी मुस्लिम बांधवांनी जोरदार खरेदी सुरू केली आहे. विशेषतः शीरखुर्मा आणि अन्य पारंपरिक गोड पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत स्थानिक दूध विक्रेत्यांनी दरात मोठी वाढ केली असून, सध्या तबल्याचे खुले दूध प्रति लिटर 96 रुपये दराने विकले जात आहे.
दरम्यान, दूध कंपन्यांचे पॅकेट दूध मात्र 56 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. परंतु, खुल्या दुधाची मागणी जास्त असल्याने दूध माफियांकडून दुधाची दरवाढ मोठ्या प्रमाणात केल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत आहे.