Ministers In Mahayuti Govt | मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी पुण्यातील आमदारांची फिल्डिंग

Election Chair

मुंबई: Ministers In Mahayuti Govt | विधानसभा निवडणुकीचा निकाल (MH Assembly Election Results 2024) जाहीर झाल्यापासून महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती (Who Will Next CM Of Maharashtra). मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीच्या नेत्यांचा आदेश मान्य असेल असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री (CM Of BJP) असणार अशी चर्चा सुरु आहे. त्यानुसार आता मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची यासंबंधीची तयारी सुरू झाली. त्यामुळे पुण्यातील इच्छुक आमदारांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच आता मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी पुण्यातील आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), सुनील कांबळे (Sunil Kamble), राहुल कुल (Rahul Kul) हे मुंबईतच ठाण मांडून असून, नक्की कोणाच्या पदरात मंत्रिपदाची माळ पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

प्रामुख्याने सलग चार टर्म विजयी झालेल्या आमदार माधुरी मिसाळ या गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. तर अनुसूचित जाती प्रवर्गातून आमदार सुनील कांबळे आणि भाजपचे आमदार राहूल कुल हे ही मुंबईतच आहे. याशिवाय भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir), राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatrya Bharne), शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची नावे चर्चेत असून, आपल्या नेत्यांकडे मंत्रिपदासाठी या आमदारांचे लॉबिग सुरू आहे.

येत्या काळात राज्यात १२ महापालिका आणि जवळपास २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. महायुतीला विधानसभेत मिळालेले नेत्रदीपक यश पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात. महापालिकांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होऊ शकतात. मंत्रिपदी वर्णी लावताना होऊ घातलेल्या निवडणुकांचा विचार होईल अशीही चर्चा आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी