Mitesh Patange | फॅमिली इंटिरियर आणि शंभाला होम तर्फे रंगणार “बॉलिंग टूर्नामेंट”
नवीन खेळांचा आनंद घेण्यासाठी बॉलिंग टूर्नामेंटचे आयोजन -मितेश पतंगे
पुणे : Mitesh Patange | प्रचलित आणि पारंपरिक खेळा सोबतच आता नवीन खेळांचा अनुभव आणि आनंद घेता यावा यासाठी फॅमिली इंटिरियर मॅगझिन ने बॉलिंग टूर्नामेंटचे आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये एकूण ७५ आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर सहभागी होणार असून त्यात ३५ महीला खेळाडूंचा समावेश आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी शंभाला होम्स यांचे टायटल स्पॉन्सर म्हणून सहकार्य लाभले आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक व फॅमिली इंटिरियर मॅगझिनचे संचालक मितेश पतंगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संभाला होमचे संचालक आदित्य जिंदाल व विष्णू नायर देखील उपस्थित होते.
मितेश पतंगे म्हणाले, कामाच्या व्यापातून थोडीशी फुरसत घेऊन आपल्याच क्षेत्रातील मित्र मैत्रिणींसोबत आनंदी वेळ घालता यावा या प्रमुख उद्देशाने सदर बॉलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फॅमिली इंटरियर गेल्या सात वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील एकमेकांमधील संवाद आणि नेटवर्किंग वाढेल.
स्पर्धे विषय बोलताना ते म्हणाले, स्पर्धेत एकुण सात संघ मालक असून प्रत्येक मालकाकडे दोन संघ असतील. एका टीममध्ये पाच सराव वास्तुविशारद आणि इंटीरियर डिझायनर असणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्व वास्तुविशारद, इंटिरियर डिझायनर्ससाठी सहा दिवस सराव सत्राची योजना आखली असून स्पर्धेचा अंतिम सामना १४ आणि १५ डिसेंबर रोजी गेम पॅलाझो मिल्स येथे खेळला जाणार आहे; असे देखील त्यांनी नमूद केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी