MLA Atul Benke-Sharad Pawar | अजित पवारांना पुन्हा धक्का! आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट
शिरूर: MLA Atul Benke-Sharad Pawar | राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. अजित पवार गटातील (Ajit Pawar NCP) अनेक पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत. मागेच पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी अजित पवार यांची साथ सोडत इतर पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. (MLA Atul Benke-Sharad Pawar)
त्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवार यांनी आज दौऱ्यावर असताना खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्याठिकाणी भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके ही उपस्थित होते. यावेळी बेनके यांनी भेट घेत शरद पवार यांच्यासोबत चर्चाही केली.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार अतुल बेनके यांनी काही दिवस तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी बेनके यांच्या जुन्नर मतदारसंघातूनही (Junnar Assembly Constituency) मोठे मताधिक्य घेतले. यानंतर आता बेनके पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवारांना हा आणखी एक धक्का समजला जातोय.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक