MLA Hiraman Khoskar | ‘मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा’; काँग्रेसच्या नेत्याचे पक्षश्रेष्ठींना आवाहन

मुंबई : MLA Hiraman Khoskar | विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election Maharashtra) निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली घडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची तब्बल ८ मते फुटली आहेत. यासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) दिल्लीला पाठवला असून, पक्षविरोधी कृती केल्याबद्दल कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आल्याची माहिती आहे.
१९ जुलै रोजी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. जागावाटपा संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीतून के. सी वेणुगोपाल (K. C. Venugopal) आणि प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेत निवडणुकीत जे आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची इतर नेते मागणी करणार आहेत. या मागणीनंतर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे मविआची नाचक्की झाली. यामध्ये तब्ब्ल ८ मते फुटल्याची चर्चा रंगली आहे. त्यामध्ये भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असलेले आमदार आणि इतर आमदार यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव या यादीत घेतलं जाऊ लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला असून माझी बदनामी थांबवा असे आवाहन केले आहे.
हिरामण खोसकर म्हणाले, “माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची बदनामी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्ष हायकमांडने थांबवली पाहिजे.
माझ्यावर कारवाई करायची असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी मतदान चेक करा.
मी फुटलो, असं जे सांगितलं जातंय ते पक्षाने आणि प्रसारमाध्यमांनी थांबवलं पाहिजे,” असं आवाहन खोसकर यांनी केलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड