MLA Jitesh Antapurkar Meet BJP Leader | काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर अशोक चव्हाणांच्या भेटीला
मुंबई : MLA Jitesh Antapurkar Meet BJP Leader | नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Maharashtra) काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting In Vidhan Parishad Election) केल्याचे समोर आले. काँग्रेसच्या आमदारांनी (Congress MLA) महायुतीच्या उमेदवारांना (Mahayuti Candidate) मत दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. दुसरीकडे महायुतीचे नऊही उमेदवार निवडून आले.
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांना पक्षाची दारे बंद असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिले. दरम्यान कारवाई होणाऱ्या आमदारांमध्ये झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique), सुलभा खोडके (Sulbha Sanjay Khodke), हिरामण खोसकर (Hiraman Khoskar), जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे (Mohan Hambarde) यांची नावे असल्याची माहिती समोर आली.
ज्या आमदारांनी पक्षादेश डावलला त्या आमदारांच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) देगलूर विधानसभा मतदारसंघाचे (Deglur Assembly Constituency) आमदार जितेश अंतापूरकर यांच्याही नावाची चर्चा आहे. अशातच आज जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट घेतली आहे.
जितेश अंतापूरकर हे सुरुवातीपासूनच अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे या आमदारांनी लगेच भाजप प्रवेश करणं टाळलं आणि ते काँग्रेससोबतच राहिले.
मात्र विधानपरिषद निवडणुकीत सदर आमदारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेला आदेश डावलल्याचे दिसत आहे. (MLA Jitesh Antapurkar Meet BJP Leader)
त्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार अंतापूरकर यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली असून ते आगामी काळात काय निर्णय घेतात,
हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या