MLA Ramesh Bornare On Uddhav Thackeray | ‘2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न’, आमदार रमेश बोरनारेंचा उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप

uddhav-thackeray

पुणेरा आवाज – Ramesh Bornare On Uddhav Thackeray | शिवसेनाचे (शिंदे गट) वैजापूरचे (Vaijapur Assembly Constituency) आमदार रमेश बोरनारे यांनी उध्दव ठाकरेंवर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बुधवारी केला. (Maharashtra Assembly Election 2024)

उध्दव ठाकरे यांनी नुकतीच बोरनारे येथे जाहीर सभा घेऊन म्हटले होते की, “४० आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या मातीला गद्दारीचा कलंक लावला. वैजापूरच्या आमदाराने या भूमीलाही कलंक लावला आहे. येत्या निवडणुकीत या गद्दारांनी शिवसेनेच्या मशालीचा सामना करून दाखवावा”. (Shivsena Shinde Group)

ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी बोरनारे यांनी बुधवारी वैजापुरात सभा घेतली. त्यात ते म्हणाले की, “२०१९ च्या निवडणुकीत वैजापूर विधानसभेची उमेदवारी देत असताना पैशाचा वापर होणार होता. पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला गेला. एका माणसाला बळजबरीने पैशांच्या बदल्यात उमेदवारी दिली जाणार होती. उमेदवारी विकण्याचा घाट त्यांनी घातला होता आणि काल ते वैजापूरला येऊन माझ्यावर टीका करून गेले. ते म्हणाले, रमेश बोरनारेला उलटं टांगलं असतं. मात्र मी असं बोललो की आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करताना पाहिलं असतं तर त्यांनीच तुम्हाला उलटं टांगलं असतं”.

माजी मुख्यमंत्र्यांचा तोल ढासळला आहे

आमदार बोरनारे म्हणाले, “माजी मुख्यमंत्र्यांचा तोल ढासळला आहे. त्यामुळेच एका आमदारावर टीका करू लागले आहेत. ते त्यांना शोभत नाही. आम्हाला वाटलेलं वैजापूरला आल्यावर ठाकरे एखाद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. पण ते आले आणि टीका करून गेले. मला फक्त एकच सांगायचं आहे की मागील निवडणुकीत मला सहज उमेदवारी मिळाली नाही. ते शेवटच्या क्षणी पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. मात्र मी त्यांना भेटून सांगितलं की गेल्या २५ वर्षांपासून मी शिवसेनेसाठी किती काम केलं आहे. मी त्यांना आजवर केलेल्या कामांची माहिती दिली. मी त्यांना म्हटलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही तर शिवसैनिक आत्महत्या करतील”.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Chavan Death Case | शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून कोर्टात जनहित याचिका

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed