MLA Sanjay Gaikwad | काँग्रेसची दिल्ली पोलिसात तक्रार; शिवसेना शिंदे गटाच्या आमदारासह दोन केंद्रीय मंत्री अडचणीत

मुंबई : MLA Sanjay Gaikwad | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी परदेशात असताना आरक्षणासंदर्भात एक विधान केले होते. त्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक होत टीका केली होती. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देणार असल्याचे भाष्य संजय गायकवाड यांनी केले होते.
त्यानंतर आता काँग्रेसने दिल्लीत आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय माकन (Ajay Maken) यांनी एनडीएच्या (NDA Leaders) चार नेत्यांविरोधात दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात (Tughlak Road Police Station) तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की “काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य हा जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी हे संविधानाचे पुस्तक दाखवून भाजप ते बदलून टाकेल असे खोटं नॅरेटिव्ह पसरवतात.
पण प्रत्यक्षात देशाला ४०० वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे.
मराठा, धनगर आणि ओबीसी सारखे समाज इथं आरक्षणासाठी लढत आहेत,
पण ते देण्याऐवजी राहुल गांधी त्यांचे आरक्षणाचे लाभ संपवण्याची भाषा करत आहेत.
त्यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये बक्षीस देईन,” असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हंटले होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा