MLA Sunil Shelke | आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले,”शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच, पण..”

MLA Sunil Shelke

पुणे : MLA Sunil Shelke | शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी उपस्थित होत शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. (MLA Sunil Shelke)

दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच होईल असे वक्तव्य केले आहे. शेळके पिंपरी चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ” महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बघता कोण कुठे जाईल आणि कोण कोणासोबत युती करेल याचा भरोसा नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. परंतु, काही महत्त्वाकांक्षी व्यक्ती त्यांना एकत्र येऊ देत नाहीत, असे म्हणत शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

आमदार अतुल बेनके आणि शरद पवार यांच्या भेटीबाबतही आमदार शेळके यांनी भाष्य केले आहे. ” शरद पवार मतदारसंघात आले म्हणून अतुल बेनके यांनी स्वागत केलं. शरद पवार आणि अतुल बेनके यांच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही अशी माहिती स्वतः अतुल बेनके यांनी मला दिली”, असे शेळके म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर कोण कुठल्या पक्षात जाईल, कोण कोणाशी युती करेल याचा सध्या भरोसा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | पिंक पॉलिटिक्स वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; गुलाबी रंगाच्या जॅकेटबाबत म्हणाले,… (Video)

Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक

You may have missed