MLA Sunil Tingre | आखाड मोहत्सव रद्द करुन पुरग्रस्तांना स्नेहभोजन ! वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांचा स्तुत्य उपक्रम

MLA Sunil Tingre

पुणे : MLA Sunil Tingre | वडगाव शेरी मतदारसंघातील (Vadgaon Sheri Assembly Constituency) नागरिकांसाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी आयोजित केलेला आखाड मोहत्सव पुरसदृश्य स्थितीमुळे शुक्रवारी रद्द केला. त्याऐवजी पुरग्रस्त भागातील नागरिकांना थेट घरोघरी जाऊन तीन हजार पुरग्रस्तांना स्नेह भोजनाचे वाटप केले. (Pune Flood)

मुसळधार पावसामुळे शहरात गुरूवारी विविध भागात पुराचे पाणी शिरले, वडगाव शेरी मतदारसंघातही शांतीनगर, आशानगर, भारतनगर, यंशवतनगर, कलवड वस्ती, साईनाथनगर आदी भागांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबाना या पुराचा फटका बसला. आमदार टिंगरे यांनी पाण्यात उतरून या पुरग्रस्तांना मदत केली होती. मात्र, त्यापुढे जाऊन शुक्रवारी मतदारसंघातील नागरिकांसाठी केलेला नियोजित आखाड मोहत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून या आखाड भोजनाचे आयोजन करण्यात येत आहे. (Pune Rains)

यावेळेस मात्र पुररिस्थितीचे भान ठेवून त्यांना मोहत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी आमदार टिंगरे यांनी स्वत: कार्यकर्त्यांबरोबर जाऊन पुरग्रस्तांना नागरिकांना आखाड भोजनाचे वाटप केले. पुरामुळे विविध शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या जवळपास तीन हजारांहून अधिक नागरिकांना हे भोजन देण्यात आले. शहरातील पुरपरिस्थितीचे भान ठेवून आमदार टिंगरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी कौतुक केले. याबाबत आमदार टिंगरे म्हणाले, आखाड मोहत्सव हा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम असतो. मात्र, आपलेच काही बांधव पुरामुळे त्रस्त असताना हा कार्यक्रम घेणे योग्य वाटले नाही. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरग्रस्तांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. (MLA Sunil Tingre)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी

Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता

Chandrakant Patil-Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Murlidhar Mohol – Pune Flood | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

You may have missed