MLA Sunil Tingre | शास्त्रीनगर चौकातील उड्डाणपूल व भुयारी मार्गाच्या आराखड्यास मंजुरी ! महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकित 97 कोटींच्या कामाला मंजुरी; आमदार सुनिल टिंगरे प्रयत्नांना यश

MLA Sunil Tingre

पुणे : MLA Sunil Tingre | येरवडा शास्त्रीनगर चौकातील (Yerwada Shastri Nagar Chowk) वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या 97 कोटींच्या प्रकल्प आराखड्यास महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकित मंजुर देण्यात आल्याची माहिती वडगाव शेरीची आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. विधानसभा निवडणूकीपुर्वीच उड्डाणपुल आणि भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ होईल असेही त्यांनी सांगितले.

नगर रस्त्यांवरील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. याबाबत माहिती देताना आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, शास्त्रीनगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो. मात्र, पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे काम रखडले होते, त्यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर मे महिन्यात राष्ट्रीय पुरातत्व विभागाने मे महिन्यात उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला या दोन्ही कामांचा आराखडा करून कामाला सुरवात करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार या दोन्ही कामांचा 97 कोटींचा आराखडा पालिकेच्या एस्टीमेट कमिटीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. बुधवारी झालेल्या बैठकित त्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. (MLA Sunil Tingre)

असा होणार उड्डाणपूल व भुयारी मार्ग

शास्त्रीनगर चौकात जो भुयारी मार्ग प्रस्तावित सहा पदरी असणारं आहे. त्यात येरवडयाकडून नगर रस्ता खराडीकडे जाण्यासाठी वाहनांसाठी तीन पदरी मार्ग तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनासाठी भुयारी मार्गाची तीन पदरी प्रस्तावित करण्यात आली आहे. या भुयारी मार्गासाठी 37 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर खराडी, विमाननगरकडून येणाऱ्या वाहनांना गोल्फक्लबकडे जाण्यासाठी दोन पदरी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपुलासाठी 26 कोटींचा खर्च येणार आहे. याशिवाय चौकातील अन्य कामांसाठी 18 कोटींचा खर्च होणार आहे.

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी येरवडा ते विमाननगरपर्यंत बीआरटी काढल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला.
शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी आता उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामालाही सुरवात होईल.
तर लवकरच शिरुर ते रामवाडीपर्यंत दुमजली उड्डाणपुलाचे कामही सुरू होईल. त्यामुळे भविष्यात नगर रस्ता सिग्नल फ्रि होईल.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed