MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ
येरवडा : MLA Sunil Tingre | वडगाव शेरी मतदार संघातील (Vadgaon Sheri Assembly Constituency) येरवडा – गांधीनगर भागात २ कोटी ४० लाखांच्या विविध विकासकामांचा आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सामाजिक सभागृह, ड्रेनेज लाईन, समाज मंदिर, बुध्द विहार अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे. (Yerawada Gandhi Nagar News)
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि आमदार स्थानिक विकास निधीतून ही कामे होणार आहेत. या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना आमदार टिंगरे म्हणाले, येरवडा भागात सर्व जाती धर्मांचे नागरिक राहतात. प्रामुख्याने सर्वसामान्य वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी या भागात त्या अनुषंगाने विकासकामे हाती घेण्यात आली. या भागात भाजी मंडईचा प्रश्न होता. लवकरच येथे सुसज्ज भाजी मंडई उभी राहील. तसेच अन्य विकासकामेही आगामी काळात सुरु होतील.
यावेळी आमदार टिंगरे यांच्या हस्ते येरवडा येथील वडारवाडी शितळा देवी मंदिराशेजारी सामाजिक सभागृह, अहिल्या पर्णकुटी येथे वाल्मिकी समाज सभागृहाचे उर्वरित बांधकाम, अशोकनगर येथील बुद्ध विहाराचा पहिला मजला बांधकाम, समता मित्र मंडळाच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम, जनसेवा मित्र मंडळ कामराज नगर येथे सामाजिक सभागृह, तिरंगा मित्र मंडळाच्या लगतच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम, जयशक्ती मित्र मंडळालगतच्या समाज मंदिराचे उर्वरीत काम, दुर्गाकाली माता प्रतिष्ठान जवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, नवी खडकी सुभाषनगर येथे सामाजिक सभागृह बांधणे, माणिकनगर याठिकाणी वाघरी समाज सभागृहाचे बांधकाम, दक्षिणमुखी गणपती मंदिराशेजारी सामाजिक सभागृह बांधकाम, यशन्वतनगर येथील सामाजिक भवन, छत्रपती संभाजी महाराज चौक लक्ष्मीनगर येथे सामाजिक सभागृह आणि पर्णकुटी पायथा येथील समाज मंदिराचे बांधकाम अशा कामांचा समावेश आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Traffic Jam On Nagar Road) सोडविण्यासाठी शिरूर ते रामवाडी पर्यंत दुमजली उड्डाणपुलाला राज्य शासनाने मंजुरी दिली. हा मार्ग पूर्वी वाघोलीपर्यंत प्रस्तावित होता, मात्र शहराच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी तो रामवाडीपर्यंत व्हावा यासाठी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले.
माझ्या वडगाव शेरी मतदार संघासाठी गणेशोत्सवाच्या पुर्व संध्येला महायुती सरकारने हा निर्णय घेऊन मोठी भेट दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यासर्वांचा मी आभारी आहे.
– सुनिल टिंगरे (आमदार, वडगाव शेरी)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा